बदलते समाज, उर्फ सोशल डायनॅमिक्स
पृथ्वीवर विखुरलेल्या मानवी समाजांचा शास्त्रीय अभ्यास शक्य आहे या विश्वासातून समाजशास्त्र निर्माण झाले. अस्तित्वात असलेल्या समाजांचे तपशीलवार निरीक्षण व असित्वात नसलेल्या समाजांचा इतिहास, असा विषय उपलब्ध होऊ शकतो. इ.स. पूर्व ३००० ते इ.स. २००० असा सुमारे ५००० वर्षांचा काळ इतिहासाचा काळ समजता येईल, कारण त्याबाबतची वस्तुनिष्ठ दृष्टीने टिपून ठेवलेली वर्णने मिळू शकतात. त्या आधीच्या काळात …